ETV Bharat / sports

हिटमॅन रोहितच्या फटक्याने जखमी झाली चाहती; रोहितचे सरप्राईज पाहून खुलली कळी - autograph

बांग्लादेश विरुध्दच्या सामन्यात रोहितने मारलेला जोरदार फटक्याने प्रेक्षकात बसलेल्या भारतीय समर्थक मीनाला दुखापत झाली. ही बाब कळताच रोहितने सामना संपल्यानंतर मीनाची भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच रोहितने आपली स्वाक्षरी असलेली टोपी मीनाला भेट दिली. तेव्हा मीनाची कळी खुलली आणि ती झालेली दुखापत विसरुन रोहितने दिलेल्या 'सरप्राईज'चा आनंद व्यक्त केला.

हिटमॅन रोहितच्या फटक्याने जखमी झाली चाहती; रोहितचे सरप्राईज पाहून खुलली कळी
author img

By

Published : Jul 4, 2019, 9:49 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने बांग्लादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात 'हिरो' ठरला तो रोहित शर्मा. हिटमॅन रोहितने या सामन्यात ९२ चेंडूत ७ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकत शतकी खेळी केली. खेळीदरम्यान रोहितने मारलेला गगनचुंबी चेंडू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मीना नावाच्या मुलीला लागला आणि तिला दुखापत झाली. तेव्हा रोहित शर्माने सामन्यानंतर मीनाची भेट घेत तिला 'सरप्राईज' दिले.

रोहितने बांग्लादेशच्या गोलंदाजांना मैदानात 'सळो की पळो' करुन सोडले होते. या खेळीदरम्यान रोहितने मारलेला जोरदार फटक्याने प्रेक्षकात बसलेल्या भारतीय समर्थक मीनाला दुखापत झाली. ही बाब कळताच रोहितने सामना संपल्यानंतर मीनाची भेट घेत त्यांची विचारपूस केली. तसेच रोहितने आपली स्वाक्षरी असलेली टोपी मीनाला भेट दिली. तेव्हा मीनाची कळी खुलली आणि ती झालेली दुखापत विसरुन रोहितने दिलेल्या 'सरप्राईज'चा आनंद व्यक्त केला.

या भेटीदरम्यान, रोहित शर्माने खूप मस्ती केली. त्याने मीनाला कॅच कसा पकडायचा, हे शिकवले. जर पुन्हा प्रेक्षकात बसल्यानंतर चेंडू आला तर ती जखमी होऊ नये यासाठी त्याने कॅच कसा पकडायचा, हे समजावून सांगितले. रोहित शर्माने अनपेक्षित भेट दिल्याने मीना खूश दिसत होती. या भेटीचे फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.