मुंबई - ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारून पराभव झाला. भारताच्या या पराभवानंतर संघाची उपकर्णधार मराठमोळी स्मृती मानधानाने चाहत्यांची माफी मागितली आहे.
भारतीय संघाने ग्रुप फेरीतील चारही सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर इंग्लंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तेव्हा भारतीय संघ अ गटातून अव्वल असल्याने, तो थेट अंतिम फेरीत पोहोचला. भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे चाहत्यांना पहिल्या विजेतेपदाची आशा होती. पण अंतिम सामन्यात भारताला दारून पराभव पत्कारावा लागला.
भारताच्या या पराभवानंतर स्मृतीने सोशल मीडियावरून चाहत्यांची माफी मागितली. तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, 'एमसीजीवर झालेल्या अंतिम सामन्यात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. अंतिम सामन्यात आमचा पराभव झाला त्याबद्दल मी सर्व चाहत्यांची माफी मागते. पण तुमचा हाच पाठिंबा आम्हाला पुढे जाण्याची हिम्मत देतो.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी संघाचे कौतुक केले आणि ज्यांच्या मेहनतीमुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकलो, त्या सर्वांचे मी आभार मानते, असेही स्मृतीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने १८४ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मूनी यांच्या झंझावतासमोर भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ९९ धावांवर बाद झाला आणि भारताने हा सामना तब्बल ८५ धावांनी गमावला.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : मैदान रिकामेच राहणार.. पहिल्या सामन्याकडे चाहत्यांनी फिरवली पाठ
हेही वाचा - IND VS SA : कोरोनाच्या धास्तीने भारतीय खेळाडू म्हणतो... 'ही' गोष्ट टाळणार