शारजाह - महिलांच्या टी-२० चॅलेंज स्पर्धेत स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने मिताली राजच्या वेलॉसिटी संघाचा दारूण पराभव केला. मागील सामन्यात वेलॉसिटीने गतविजेत्या सुपरनोव्हाजवर विजय मिळवत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली होती. पण त्यांना दुसऱ्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने ९ गडी राखून पराभूत केले. ट्रेलब्लेझर्सच्या माऱ्यासमोर वेलॉसिटी संघाचा डाव ४७ धावांत संपुष्टात आला. तेव्हा ट्रेलब्लेझर्सने हा सामना 7.5 षटकात एका गड्याचा मोबदल्यात सहज जिंकला. दरम्यान, महिला टी-२० स्पर्धेतली ही निचांकी धावसंख्या ठरली.
-
#Trailblazers start their #JioWomensT20Challenge campaign in style as they thump #Velocity by 9 wickets. 👌🔝🔥#VELvTBL #JioWomensT20Challenge
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
LIVE: https://t.co/tecCY5u0vl pic.twitter.com/2lCuQH0flN
">#Trailblazers start their #JioWomensT20Challenge campaign in style as they thump #Velocity by 9 wickets. 👌🔝🔥#VELvTBL #JioWomensT20Challenge
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
LIVE: https://t.co/tecCY5u0vl pic.twitter.com/2lCuQH0flN#Trailblazers start their #JioWomensT20Challenge campaign in style as they thump #Velocity by 9 wickets. 👌🔝🔥#VELvTBL #JioWomensT20Challenge
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
LIVE: https://t.co/tecCY5u0vl pic.twitter.com/2lCuQH0flN
वेलॉसिटीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा अनुभवी झुलन गोस्वामीने शेफाली वर्माचा १३ धावांवर त्रिफळा उडवला. यानंतर वेलॉसिटीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. डॅनी वॅट, मिताली राज, वेदा कृष्णमुर्ती, सुषमा वर्मा अशा सर्व नावाजलेल्या फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिल्या. ट्रेलब्लेझर्सकडून सोफी एस्कलस्टोनने ४, झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी २-२ तर दिप्ती शर्माने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल ट्रेलब्लेझर्सची सुरुवातही खराब झाली. कर्णधार स्मृती मंधाना लेह कास्परेकच्या गोलंदाजीवर ६ धावा काढून माघारी परतली. मात्र यानंतर डेंड्रा डॉटीन आणि रिचा घोष यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत ट्रेलब्लेझर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा - IPL २०२० : मुंबई-दिल्ली अंतिम फेरी गाठण्यासाठी आज झुंजणार
हेही वाचा - 'थाला' धोनीबद्दल चेन्नईचे मालक श्रीनिवासन यांनी केली महत्वाची घोषणा, म्हणाले...