ETV Bharat / sports

मराठमोळ्या स्मृतीची दमदार खेळी, टीम इंडियाने जिंकली मालिका - महिला क्रिकेट विषयी बातम्या

मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिला संघाने अखेरचा सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. स्मृती मानधनाला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

मराठमोळ्या स्मृतीची दमदार खेळी, टीम इंडियाने जिंकली मालिका
author img

By

Published : Nov 7, 2019, 12:08 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन - भारत-वेस्ट इंडीज महिला संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने २-१ ने बाजी मारली. मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिला संघाने अखेरचा सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. स्मृती मंधानाला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

अखेरच्या सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विडींज कर्णधार स्टेफनीचा हा निर्णय अंगलट आला. विडींजचा निम्मा संघ १०० धावांच्या आत माघारी परतला. तेव्हा कर्णधार स्टेफनी टेलरने (७९) अर्धशतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याला स्टेसी किंगने ३८ धावा काढत चांगली साथ दिली. दोघांमुळे विडींजचा संघ १९४ धावांपर्यंत पोहोचला. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

१९४ धावांच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर जोडी स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची शतकी भागीदारी रचत विजयाचा मार्ग सुलभ केला. स्मृती मंधानाने ७४ तर रॉड्रीग्जने ६९ धावा केल्या. या दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर पुनम राऊत आणि मिताली राज यांनी फटकेबाजी केली. मात्र दोघेही बाद झाल्यानंतर दिप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौरच्या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा - पश्चिम ऑस्ट्रेलिया पृथ्वीवरील सर्वांत सुंदर स्थळांपैकी एक - अॅडम गिलख्रिस्ट

हेही वाचा - बांगलादेशी खेळाडूंना दिल्लीच्या प्रदूषणाचा फटका, तब्येत बिघडली

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.