लंडन - क्रिकेटचे 'बायबल' समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित अशा विस्डेनने २०१० ते २०१९ या दशकातील सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर केला आहे. विस्डेनने निवडलेल्या संघात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना स्थान मिळाले. मात्र, भारताच्या दोन मोठ्या क्रिकेटपटूंना या संघातून वगळण्यात आले आहे.
हेही वाचा - VIDEO : 'मी माझ्या मुलीला आरती करताना पाहिलं आणि टीव्हीच फोडून टाकला' - शाहिद आफ्रिदी
'हिटमॅन' अशी ओळख असलेल्या रोहित शर्मा आणि कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंचकडे या संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून इंग्लंडच्या जोस बटलरकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
२१ व्या शतकातील दुसऱ्या दशकात म्हणजे २०१०-२०१९ मध्ये एकूण ८९७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले गेले. त्यात २ लाख ४९ हजार ५७८ धावा करण्यात आल्या, तर ११ हजार २९३ बळी टिपले गेले. यास राना, लॉरेन्स बूथ, फिल वॉकर आणि जो हार्मन या चार सदस्यांच्या समितीने या संघातील खेळाडूंची निवड केली आहे.
दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूंचा संघ –
अॅरॉन फिंच (कर्णधार), कॉलिन मुनरो, विराट कोहली, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जोस बटलर, मोहम्मद नबी, डेव्हिड विले, रशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.