कराची - आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानचे खेळाडू, चाहते, अधिकारी आणि पत्रकारांना व्हिसाचे हमीपत्र देण्यात यावे. अन्यथा विश्वकरंडक स्पर्धा भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात यावी, या मागणीवर आम्ही कायम राहू, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी सांगितले.
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर या दरम्यान, टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमिवर लाहोर येथील पीसीबी मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मनी यांनी विविध मागण्या केल्या. यात त्यांनी पाकिस्तानचे खेळाडू, चाहते, अधिकारी आणि पत्रकारांना व्हिसाचे हमीपत्र भारताकडून मिळायला हवे, अशी मागणी केली. भारताने आम्हाला लेखी हमी द्यावी, अन्यथा आम्ही विश्वकरंडक भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याची मागणी करू, असे सांगितले.
मनी म्हणाले, 'क्रिकेट जगतातील अव्वल तीन राष्ट्रांच्या मानसिकतेत बदलाची नितांत आवश्यकता आहे. आम्हाला फक्त संघासाठीच नव्हे, तर चाहते, पदाधिकारी आणि पत्रकारांसाठीही व्हिसाची हमी हवी. मार्चच्या अखेरपर्यंत आम्हाला लिखित स्वरुपात ही हमी हवी.'
दरम्यान मणी यांनी भारतीय क्रिकेट मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेबाबतही लिखित हमी मागितली आहे.
हेही वाचा - ख्रिस मॉरिस नव्हे तर विराट आहे आयपीएलचा महागडा खेळाडू
हेही वाचा - टीम इंडियात निवड झाल्यानंतर सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...