एंटीगा - वेस्ट इंडीज संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, उभय संघातील टी-२० मालिका विंडीज संघाने २-१ अशा फरकाने जिंकली होती.
-
WI win the 1st CG Insurance ODI by 8 wickets!🥳👏🏽#WIvSL #MenInMaroon #cgcoralisle #Roadto2023 pic.twitter.com/6FBva7LBng
— Windies Cricket (@windiescricket) March 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">WI win the 1st CG Insurance ODI by 8 wickets!🥳👏🏽#WIvSL #MenInMaroon #cgcoralisle #Roadto2023 pic.twitter.com/6FBva7LBng
— Windies Cricket (@windiescricket) March 10, 2021WI win the 1st CG Insurance ODI by 8 wickets!🥳👏🏽#WIvSL #MenInMaroon #cgcoralisle #Roadto2023 pic.twitter.com/6FBva7LBng
— Windies Cricket (@windiescricket) March 10, 2021
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ४९ षटकात सर्वबाद २३२ धावांपर्यंत मजल मारता आली. दनुष्का गुणतिलका याने ६१ चेंडूत सर्वाधिक ५५ धावा केल्या. तर कर्णधार दिमुख करुणारत्ने (५२) आणि एशन बंडारा या दोघांनी (५०) देखील अर्धशतक झळकावत आपलं योगदान दिलं. विंडीजकडून जेसन होल्डर आणि जेसन मोहम्मद यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर केरॉन पोलार्ड, फॅबियन एलन आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी १-१ गडी टिपला.
-
Raise that bat @shaidhope!🏏 #WIvSL #MenInMaroon #cgcoralisle pic.twitter.com/4kRAwiNqxk
— Windies Cricket (@windiescricket) March 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Raise that bat @shaidhope!🏏 #WIvSL #MenInMaroon #cgcoralisle pic.twitter.com/4kRAwiNqxk
— Windies Cricket (@windiescricket) March 10, 2021Raise that bat @shaidhope!🏏 #WIvSL #MenInMaroon #cgcoralisle pic.twitter.com/4kRAwiNqxk
— Windies Cricket (@windiescricket) March 10, 2021
श्रीलंकेने विजयासाठी दिलेले २३३ धावांचे लक्ष विंडीज संघाने १८ चेंडू आणि २ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर शॉय होपने १३३ चेंडूत ११० धावांची खेळी केली. तर त्याला एविन लुईसने ६५ धावा करत चांगली साथ दिली. डॅरेन ब्रावोने ४७ चेंडूत नाबाद ३७ धावा करत संघाला विजयावर मोहोर लावली. शतकी खेळी करणाऱ्या शॉय होपला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय संघातील दुसरा सामना १२ मार्चला होणार आहे.
हेही वाचा - IND VS ENG : हार्दिक म्हणतोय.. तयारी झाली आहे, मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही
हेही वाचा - भारतात होणाऱ्या टी-२० विश्व करंडकाचा 'हा' संघ असेल मुख्य दावेदार; इंग्लंडच्या खेळाडूची भविष्यवाणी