टाँटन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील २३व्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशसमोर विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान बांगलादेशने ४२ व्या षटकामध्ये ३ गड्याच्या मोबदल्यात मिळवले. बांगलादेशकडून शाकिबने १२४ तर लिटन दासने केली ९४ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
-
Bangladesh Win! Tigers defeated Windies by 7 wickets to clinch their second victory in #CWC19 🙌#BANvWI #RiseOfTheTigers #KhelbeTigerJitbeTiger pic.twitter.com/PpvUkwxlFd
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bangladesh Win! Tigers defeated Windies by 7 wickets to clinch their second victory in #CWC19 🙌#BANvWI #RiseOfTheTigers #KhelbeTigerJitbeTiger pic.twitter.com/PpvUkwxlFd
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2019Bangladesh Win! Tigers defeated Windies by 7 wickets to clinch their second victory in #CWC19 🙌#BANvWI #RiseOfTheTigers #KhelbeTigerJitbeTiger pic.twitter.com/PpvUkwxlFd
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 17, 2019
वेस्ट इंडिजकडून एव्हीन ल्युईसने ७०, शाय होपने ९६ तर शिमरॉन हेटमायरने ५० यांनी दमदार अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या तिनशेपार नेली. अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार होल्डरने शानदार फटकेबाजी करत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १५ चेंडूत ३३ धावा चोपल्या. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मुस्ताफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर शाकिब अल हसनला २ विकेट घेण्यात यश आले.
टाँटन काउंटी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी पाचारण केले होते.