ETV Bharat / sports

वेस्ट इंडिज दौराः विराट कोहलीसह जसप्रीत बुमराहला विश्रांती - विराट कोहली

आयसीसी  विश्वकरंडक स्पर्धेनंतर १५ दिवसांनी भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱयासाठी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे.

वेस्ट इंडिज दौराः विराट कोहलीसह जसप्रीत बुमराहला विश्रांती
author img

By

Published : Jun 23, 2019, 7:45 PM IST

मुंबई - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेनंतर १५ दिवसांनी भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱयासाठी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत या दोन कसोटींचा समावेश आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. विराट आणि जसप्रीतला टी-२०, वन-डे मालिकेत विश्रांती देण्यात येईल हे जवळपास नक्की आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून विराट सतत क्रिकेट खेळत आहे. तर बुमराहवर अतिक्रिकेटमुळे येणारा ताण हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. मात्र हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेसाठी खेळणार आहेत. असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं.

विराट आणि बुमराह सोबत बीसीसीआय आणखी काही खेळाडूंनाही विश्रांती देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान भारतीय संघ सद्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये खेळत असून भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवेल असा विश्वास व्यक्त होत आहे. जर असे झाल्यास भारतीय संघ जुलै महिन्याच्या १४ तारखेपर्यंत इंग्लडमध्ये राहिल. या सर्व बाबीचा विचार करुन विंडीज दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.