नवी दिल्ली - बीसीसीआयने आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली. आता याच टीम इंडियाविरुद्ध विंडीजच्या टी-20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात स्फोटक खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले असून कार्लोस ब्रेथवेटकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
विंडीजच्या संघात आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, कार्लोस ब्रेथवेट, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर यासारख्या धडाकेबाज फलंदाजांना संघात स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणचीही संघात वर्णी लागली आहे. धडाकेबाज फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या आंद्रे रसेलला दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. विश्वकरंडकात त्याच्या जागी स्थान देण्यात आलेल्या सुनील आंब्रीसला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. आपल्या 'सॅल्यूट'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शेल्ड्रन कॉट्रेललाही संघात स्थान देण्यात आले आहे. शिवाय, यष्टीरक्षक फलंदाज अँथनी ब्रॅम्बल हा नवीन खेळाडू संघात सामील झाला आहे.
-
BREAKING: WEST INDIES SQUAD RELEASED FOR 1ST AND 2ND T20I vs INDIA IN FLORIDA. #ItsOurGame pic.twitter.com/gGU5Gde77E
— Windies Cricket (@windiescricket) July 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BREAKING: WEST INDIES SQUAD RELEASED FOR 1ST AND 2ND T20I vs INDIA IN FLORIDA. #ItsOurGame pic.twitter.com/gGU5Gde77E
— Windies Cricket (@windiescricket) July 22, 2019BREAKING: WEST INDIES SQUAD RELEASED FOR 1ST AND 2ND T20I vs INDIA IN FLORIDA. #ItsOurGame pic.twitter.com/gGU5Gde77E
— Windies Cricket (@windiescricket) July 22, 2019
वेळापत्रकानुसार 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी विराटलाच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.