ETV Bharat / sports

AFG VS WI ODI Series : अफगाणिस्तान विरुध्द वेस्ट इंडीजचा मालिका विजय - वेस्ट इंडीज विरुध्द अफगाणिस्तान

विडींजचे २४८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरेल्या अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. संघाची धावसंख्या अवघी एक असताना सलामीवीर जावेद अहेमदी बाद झाला. त्यानंतर रहमत शाह (३३) हजरत उल्लाह जजई (२३) या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागिदारी रचली. शाह धावबाद झाला. त्यानंतर अफगाणिस्तानचा निम्मा संघ १०९ धावांवर परतला.

AFG VS WI : वेस्ट इंडीजने मालिका जिंकली, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव
author img

By

Published : Nov 10, 2019, 10:28 AM IST

लखनऊ - अटल बिहारी वाजपेयी एकना मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडीजने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. निकोलस पूरनच्या आक्रमक अर्धशतकी खेळी तसेच गोलंदाजीनी केलेला भेदक माऱ्याच्या जोरावर विडींजने विजय साकारला.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वेस्ट इंडीजने निकोलस पूरन (५० चेंडूत ६७), लुईस (५४) आणि हेटमेयर (३४) यांच्या खेळींच्या जोरावर २४७ धावा केल्या.

विडिंजचे २४८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरेल्या अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. संघाची धावसंख्या अवघी एक असताना सलामीवीर जावेद अहेमदी बाद झाला. त्यानंतर रहमत शाह (३३) हजरतउल्लाह जजई (२३) या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागिदारी रचली. शाह धावबाद झाला. त्यानंतर अफगाणिस्तानचा निम्मा संघ १०९ धावांवर परतला.

नजीबल्लाह आणि मोहम्मद नबीने डाव सावरला. दोघांनी ३२ धावा जोडल्या. संघाची धावसंख्या १७७ असताना नजीबुल्लाह व्यक्तिगत ५६ धावांवर बाद झाला. नजीबुल्लाह पाठोपाठ नबीही (३२) बाद झाला. तळातील फलंदाज संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. अफगाणिस्तानचा संघ २०० धावांवर आटोपला. शेल्डन कॉट्रेल, रोस्टन चेस आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

हेही वाचा - टीम इंडियासाठी नागपूरचे मैदान धोकादायक, विजयासाठी 'या' बाबी ठरणार महत्वपूर्ण

हेही वाचा - सहा वेळा विश्वविजेती मेरीला ऑलिम्पिकसाठी निखतसोबत खेळावी लागणार चाचणी लढत

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.