काश्मीर - गवताळ मैदानात क्रिकेट खेळताना तुम्ही पाहिलं असेल, पण चक्क बर्फाने आच्छादित मैदानावर क्रिकेट खेळण्यात येत हे तुम्ही कधी ऐकलं आहे का? नक्कीच नाही ऐकलं असेल, पण असं क्रिकेट खेळलं जातं ते काश्मीरमध्ये. उत्तर काश्मीरच्या गुरेजमध्ये दरवर्षी बर्फाने आच्छादित मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ही स्पर्धा पाहण्यासाठी दूरवरुन क्रिकेट चाहते गर्दी करतात.
बांदीपुरा जिल्ह्यापासून ८५ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गुरेजमध्ये हिवाळी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. हिवाळ्यात गुरेजमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि सर्व परिसर बर्फाने आच्छादित होतो. यामुळे जवळपास ६ महिने येथील जनजीवन विष्कळीत होते. पण, अशा प्रतिकूल स्थितीतही येथे क्रिकेट खेळले जाते.
गुरेजमधील तरुण मुलं या स्पर्धेचे आयोजन करतात. ते या स्पर्धेद्वारे शासनाचे लक्ष्य केंद्रीत करु इच्छित आहेत. शासनाने जर या ठिकाणी हिवाळी स्पर्धांचे आयोजन केल्यास काश्मीरमधील तरुण खेळाडूंना चालना मिळेल. तसेच पर्यटनही वाढेल, अशी आशा येथील नागरिकांची आहे.
हेही वाचा -
विराटने सांगितलं केनसोबत 'त्या' दिवशी कोणत्या विषयावर सुरू होती चर्चा
हेही वाचा -
पाक खेळाडूंचा डान्स व्हिडिओ; चाहते म्हणाले, मुहल्ले की चुडैल....!