ETV Bharat / sports

भारतीय संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली

भारतीय संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली असल्याचे, कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

We briefly discussed it in team meeting: Kohli on farmers' protest
भारतीय संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली
author img

By

Published : Feb 4, 2021, 8:27 PM IST

चेन्नई - इंग्लंडविरुद्ध उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची रणनिती ठरवण्यासंदर्भात भारतीय खेळाडूंची बैठक झाली. या बैठकीत नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरु आहे, त्यावरही चर्चा झाली. प्रत्येक खेळाडूने आपले मत मांडले, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सांगितले.

आज (ता.४) व्हर्चुअल पत्रकार परिषदेत विराटला शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, 'भारतीय संघाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. प्रत्येकाने या मुद्यावर आपले मत मांडले.'

दरम्यान, शेतकरी आंदोलनासंदर्भात नेमकी काय चर्चा झाली ? याबद्दल सविस्तर माहिती देण्याचे विराटने टाळले.

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना आणि युवा पर्यावरण कार्यकर्ती यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे ट्विट केले. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विटचा सपाटा लावला. यात माजी खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, प्रग्यान ओझा यांनी ट्विट केले आहे.

विराटने त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलं -

मतभेदाच्या या काळात आपण सर्व एकत्र राहूया. शेतकरी हे आपल्या देशाचे अविभाज्य भाग आहेत. शांततेसाठी आणि पुढे जाण्यासाठी सर्व पक्ष सौहार्दपूर्ण तोडगा शोधून काढतील, याची मला खात्री आहे, अशा आशयाचे टि्वट विराटने केले आहे.

हेही वाचा - IND VS ENG : जो रूट म्हणतो, विराट नव्हे तर 'या' खेळाडूची विकेट आमच्यासाठी महत्वाची

हेही वाचा - शार्दुल-सुंदरची फलंदाजी पाहत होतो तेव्हा डॉक्टरांनी मला बोलावलं.., विराटने सांगितला 'तो' किस्सा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.