रायपूर - भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी ९ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००व्या शतकाला गवसणी घातली होती. विशेष म्हणजे असा विक्रम करणारा तो आजही जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. भारताच्या माजी खेळाडूंनी या विक्रमांचा आनंद सचिन समवेत साजरा केला. याचा व्हिडिओ भारताचा माजी खेळाडू प्रग्यान ओझाने शेअर केला.
सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, इरफान पठाण, युसुफ पठाण आणि प्रग्यान ओझा यासह भारताचे अनेक माजी खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळत आहेत. ९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिनने बांग्लादेशविरुद्ध आशिया करंडकात शतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००व्या शतकाला गवसणी घातली होती. या विक्रमाचा आनंद माजी खेळाडूंनी सचिन समवेत केक कापून साजरा केला.
प्रग्यान ओझाने शेअर केलेल्या व्हिडिओत, सचिन केक कापताना दिसून येत आहे. सचिनने केक कापल्यानंतर तो केक युवराज सिंह सचिनला भरवताना पाहायला मिळत आहे.
-
Different day but the reason remains the same. Celebrating @sachin_rt paaji’s 100th 100. pic.twitter.com/gKvubhsBHI
— Pragyan Ojha (@pragyanojha) March 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Different day but the reason remains the same. Celebrating @sachin_rt paaji’s 100th 100. pic.twitter.com/gKvubhsBHI
— Pragyan Ojha (@pragyanojha) March 16, 2021Different day but the reason remains the same. Celebrating @sachin_rt paaji’s 100th 100. pic.twitter.com/gKvubhsBHI
— Pragyan Ojha (@pragyanojha) March 16, 2021
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजेड्स दुसऱ्या स्थानी
रायपुरच्या शहिद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या स्थानावर असून इंडिया लिजेड्सचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशवरील विजयामुळे आफ्रिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर चौथ्या स्थानी कोण येणार, हे स्पष्ट होईल.
हेही वाचा - रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजवर कोरोनाचे सावट; सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना कोरोनाची लागण
हेही वाचा - रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज: आफ्रिका लिजेड्सने बांगलादेशचा १० गडी राखून धुव्वा उडवत गाठली उपांत्य फेरी