मुंबई - चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ च्या लिलावात खरेदी केलेला २२ वर्षीय वेगवान गोलंदाज हरिशंकर रेड्डीचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि गोलंदाज हरिशंकर यांच्यातील सरावाचा आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात केली आहे. त्यांचा सराव सुरू आहे. या सराव सत्रात धोनीसह चेन्नईचे अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. यात नव्याने संघात दाखल झालेला हरिशंकर देखील आहे. त्याने धोनीचा बचाव भेदत त्याचा त्रिफळा उडवला. विशेष म्हणजे लेग स्टंम्प बराच लांब जाऊन पडला. हरिशंकरचा वेग आणि अचूक टप्पा पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण चकीत झाले.
-
Hari Shankar Reddy taking Dhoni's wicket during the practice#IPL2021 pic.twitter.com/zpEv8gHsp8
— Vinesh Prabhu (@vlp1994) March 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hari Shankar Reddy taking Dhoni's wicket during the practice#IPL2021 pic.twitter.com/zpEv8gHsp8
— Vinesh Prabhu (@vlp1994) March 17, 2021Hari Shankar Reddy taking Dhoni's wicket during the practice#IPL2021 pic.twitter.com/zpEv8gHsp8
— Vinesh Prabhu (@vlp1994) March 17, 2021
हरिशंकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नईने हरीशंकर रेड्डीला आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी २० लाखांच्या बेस प्राईजवर आपल्या ताफ्यात घेतले आहे. दरम्यान, आयपीएलच्या १३ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नईचा संघ पहिल्यांदाच बाद फेरी गाठू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामासाठी चेन्नईने जोरदार तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा - Ind vs Eng ४th t२० : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
हेही वाचा - सचिनच्या विश्वविक्रमी १००व्या शतकाची नववी वर्षपूर्ती, सहकार्यांनी केलं खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ