नवी दिल्ली - रणजीतील ‘सचिन तेंडुलकर’ अशी ओळख असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने क्रिकेटमधील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची निवड केली आहे. या संघाची कमान त्याने कॅप्टन कुल महेंद्रसिह धोनीला सोपवली आहे.
जाफरच्या संघात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी अशा चार भारतीय क्रिकेटपटूंना स्थान मिळाले आहे. तर, विंडीजचे दिग्गज व्हिव रिचर्ड्स यांनाही जाफरने संघात स्थान दिले आहे. जाफरने निवडलेल्या खेळाडूंचा संघ -
वसिम जाफरने १९९६-९७ या साली प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. यात त्याने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. यामुळे त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाचा पहिला सामना २४ फेब्रुवारी २०००ला खेळला. २००८पर्यंत त्याने एकूण ३१ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यात त्याने ३४.१०च्या सरासरीने १९४४ धावा केल्या. यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.