मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचे तोंड पहावे लागले. महत्वाचे म्हणजे पहिल्या डावात भारतीय संघाने आघाडी मिळवली. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी सरळसरळ शरणागती पत्कारली. भारताचा दुसरा डाव ३६ डावात आटोपला. यानंतर ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेचे झोड उठली आहे. अशात काही माजी खेळाडूंनी भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यास पुढाकार घेतला आहे. यात भारताचा माजी क्रिकेट वसीम जाफरने दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला शुभेच्छा देत कर्णधार अजिंक्य रहाणेला एक मॅसेज दिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात 'बॉक्सिंग डे' सामना होणार आहे. या सामन्याआधी वसिम जाफरने रहाणेसाठी एक ट्विट केले आहे. यात त्याने लिहलं आहे की, डियर अजिंक्य रहाणे, या ट्विटमध्ये तुझ्यासाठी एक खास मॅसेज लपलेला आहे. बॉक्सिंग डे कसोटीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाफरने रहाणेला टॅग करत हा ट्विट डिकोड करण्याचे आवाहन केले आहे.
-
Dear @ajinkyarahane88, here's a (hidden) message for you. Good luck for Boxing Day!
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
People
In
Cricket
Know
Grief
In
Life
Lingers
Aplenty
Never
Dabble
Rise
And
Handcraft
Unique
Legacy
PS: you guys are open to have a go and decode the msg too 😉#INDvsAUS #AUSvIND
">Dear @ajinkyarahane88, here's a (hidden) message for you. Good luck for Boxing Day!
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 21, 2020
People
In
Cricket
Know
Grief
In
Life
Lingers
Aplenty
Never
Dabble
Rise
And
Handcraft
Unique
Legacy
PS: you guys are open to have a go and decode the msg too 😉#INDvsAUS #AUSvINDDear @ajinkyarahane88, here's a (hidden) message for you. Good luck for Boxing Day!
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 21, 2020
People
In
Cricket
Know
Grief
In
Life
Lingers
Aplenty
Never
Dabble
Rise
And
Handcraft
Unique
Legacy
PS: you guys are open to have a go and decode the msg too 😉#INDvsAUS #AUSvIND
काय आहे जाफरच्या मॅजेसचा अर्थ
दरम्यान, जाफरने अजिंक्यसाठी लिहलेल्या या मॅसेजचा अर्थ असा आहे की, बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात शुभमन गिल आणि लोकेश राहुल यांना संघात स्थान द्यायला हवं, असा आहे.
विराट कोहली भारतात परतणार
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पॅटरनिटी लिव्ह घेतली असून तो ऑस्ट्रेलियातून भारतात परतणार आहे. त्याच्या जागेवर अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे.
हेही वाचा - ''भारतासाठी चॅम्पियनशिप बेल्ट जिंकणे हे माझे स्वप्न'', रितू फोगाटची ईटीव्ही भारतला खास मुलाखत
हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : सामनावीर खेळाडूला मिळणार 'जॉनी मुलघ' पदक