लाहोर - 'लोकांनी माझी तुलना विराटशी नव्हे तर, पाकिस्तानच्या बाबर आझमशी केली पाहिजे', असे मत पाकिस्तानचा उदयोन्मुख फलंदाज हैदर अलीने मांडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत हैदरने शानदार प्रदर्शन केले होते. शिवाय, तो कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये 'एक स्टार फलंदाज' म्हणून उदयास आला.
हेही वाचा - आर्चरचं ६ वर्षापूर्वीचं 'ते' ट्विट आणि कोरोना...नेमका काय आहे संबंध?
'एक फलंदाज कधीही त्याच्या रोल मॉडेलसारखा असू शकत नाही. परंतु मी स्वत: ला सुधारण्याचा आणि त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करेन. मला स्वत: ला सिद्ध करायचे आहे जेणेकरून लोकं माझी तुलना विराटशी नव्हे तर, बाबर आजमशी करतील. बाबरच्या भात्यात क्रिकेटचे चांगले शॉट्स आहेत', असे हैदरने युट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
'मी कोहली होऊ शकत नाही. पण सरावातून त्याचे काही शॉट्स शिकू शकतो. मी हैदर अली आहे म्हणून मी हैदर अलीसारखा खेळू शकतो', असेही हैदरने म्हटले आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीज राजाने हैदर अलीची तुलना बाबर आजम आणि विराट कोहलीशी केली होती.