हैदराबाद - माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यापूर्वी सेहवागने एक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर चाहत्यांनी सेहवागला ट्रोल केले. शारजाह येथे रंगलेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादला ३४ धावांनी पराभूत केले.
वीरूने हैदराबाद संघाचा अपमान करणारे वक्तव्य केले. सेहवाग म्हणाला, "मला वाटते, की हैदराबादला वॉकओव्हर द्यावा, कारण आमच्या फलंदाजीत २००-२५० धावा करण्याची ताकद नाही. आम्ही १५० धावांसाठीचे खेळाडू आहोत. प्रथम फलंदाजी केली तर मुंबई २००च्या वर धावा करेल.''
-
Never expected this from him @virendersehwag as if cricket is only meant for batting 😒🤦🏽♂️ #IPL2020 #MIvsSRH https://t.co/HwlQDuZa8u
— Rajesh Krishna (@itz_rajeshkrish) October 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Never expected this from him @virendersehwag as if cricket is only meant for batting 😒🤦🏽♂️ #IPL2020 #MIvsSRH https://t.co/HwlQDuZa8u
— Rajesh Krishna (@itz_rajeshkrish) October 4, 2020Never expected this from him @virendersehwag as if cricket is only meant for batting 😒🤦🏽♂️ #IPL2020 #MIvsSRH https://t.co/HwlQDuZa8u
— Rajesh Krishna (@itz_rajeshkrish) October 4, 2020
या वक्तव्यानंतर चाहते संतप्त झाले आणि त्यांनी वीरूला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक चाहत्यांनी वीरूच्या आयपीएलच्या रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह उभे केले. सेहवाग माझा आवडता फलंदाज होता. पण जेव्हा तो समालोचन करायला लागला तेव्हापासून मी त्याला नापसंत करण्यास सुरुवात केली आहे. हा माणूस पौगंडावस्थेपत असल्यासारखे वागतो, असे एका चाहत्याने म्हटले आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला विजयी लय कायम राखली. शारजाहच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. मुंबईचे २०९ धावांचे आव्हान हैदराबादला पेलवले नाही. हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत थोडाफार प्रतिकार केला. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही.