ETV Bharat / sports

सेहवाग म्हणतो, हार्दिक पंड्याच्या तोडीचा एकही खेळाडू भारतीय संघात नाही

author img

By

Published : May 15, 2019, 7:55 PM IST

हार्दिक पंड्यावर माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने केला कौतुकाचा वर्षाव

हार्दिक पंड्या

नवी दिल्ली - नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी दमदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्यावर भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग कौतुकाचा वर्षाव केला आहे. सेहवागच्या मते, सध्याच्या भारतीय संघात हार्दिक पंड्याची जागा घेणारा एकही खेळाडू नाहीय.

सेहवाग म्हणाला, 'भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंचा विचार केला तर हार्दिकशी तुलना होईल असा एकही प्रतिभावान खेळाडू नाही. जर असे असते तर, हार्दिकची विश्वचषकामध्ये निवड झाली नसती. मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात पांड्याने महत्वाची भूमिका बजावली असल्याचेही तो म्हणाला.'

हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या

हार्दिकने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या एका सामन्यात 34 चेंडूत ९१ धावांची वादळी खेळी केली होती. यंदाच्या आयपीएलमध्ये पंड्याने त्याच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर साऱ्यांचीच मने जिंकली आहेत. या हंगामात हार्दिकने १६ सामन्यांमध्ये १५ डाव खेळताना ४०२ धावा केल्या आहेत.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ

  • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

Intro:Body:

spo 5

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.