ETV Bharat / sports

''चांगला माणूस'', विराटने शेअर केला जुन्या मित्राचा फोटो - virat williamson latest news

एका कसोटी सामन्यामध्ये नाणेफेकसाठी जात असतानाचा हा फोटो विराटने ट्विटरवर शेअर केला आहे. "आम्हाला आमच्या गोष्टी आवडतात. चांगला माणूस." असे विराटने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अंडर-19 च्या दिवसांपासून हे दोन्ही खेळाडू एकमेकांना ओळखत आहेत.

Virat shares great bond with kane williamson
''चांगला माणूस'', विराटने शेअर केला जुन्या मित्राचा फोटो
author img

By

Published : May 23, 2020, 12:01 PM IST

नवी दिल्ली - सध्याच्या क्रिकेटविश्वात विराट कोहली आणि केन विल्यम्सन हे दिग्गज कर्णधार म्हणून ओळखले जातात. मैदानावर हे दोघे प्रतिस्पर्धी असले तरी आयुष्यात हे जुने मित्र आहेत. दरम्यान, विराटने एका प्रसंगाची आठवण काढत विल्यमसनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

एका कसोटी सामन्यामध्ये नाणेफेकसाठी जात असतानाचा हा फोटो विराटने ट्विटरवर शेअर केला आहे. "आम्हाला आमच्या गोष्टी आवडतात. चांगला माणूस." असे विराटने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अंडर-19 च्या दिवसांपासून हे दोन्ही खेळाडू एकमेकांना ओळखत आहेत.

दरम्यान, न्यूझीलंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, भारतीय संघ न्यूझीलंडला गेला होता. यात भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 5-0 ने जिंकली. यानंतर न्यूझीलंडने एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत शानदार पुनरागमन केले. ही मालिका न्यूझीलंडने 3-0 ने जिंकली. तसेच कसोटी मालिकेतही न्यूझीलंडने भारताला 2-0 ने व्हाईटवॉश दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.