बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. ३१५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बांगलादेशने सर्वबाद २८६ धावा केल्या. या सामन्यातील एक खास गोष्ट म्हणजे चाहत्यांमध्ये एक वयोवृध्द आजीबाई भारतीय संघाला 'चिअर' करत होत्या. आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्या प्रचंड प्रसिद्ध झाल्या. भारतीय संघातील खेळाडूंनीही त्यांची मैदानात भेट घेतली. कर्णधार विराटने त्यांची विचारपूस केली आणि इन्स्टाग्रामवर एक फोटोही शेअर केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विराटने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, 'सर्व चाहत्यांच्या विशेषत: चारुलता पटेल यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार. मी आत्तापर्यंत पाहिलेल्यांपैकी ८७ वर्षांच्या या आजी खेळासाठी खूप समर्पित आहेत. वय फक्त एक संख्या आहे. मात्र आवड आपल्याला सर्व बंधने तोडून तिथपर्यंत घेऊन येते. तिच्या डोळ्यात संपूर्ण टीमबद्दल फक्त प्रेम आणि आशिर्वाद होता, हे खूप प्रेरणादायी आहे. तिचा आशीर्वाद घेऊन पुढच्या सामन्यासाठी मैदानात उतरु'.
या आजीबाई भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकार मारल्यानंतर, पिपाणी वाजवून आनंद व्यक्त करत होत्या. त्यांचा जोश आणि उत्साह पाहून समालोचन करणाऱ्या सौरभ गांगुली आणि हर्षा भोगले यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली होती.