ETV Bharat / sports

शार्दुल-सुंदरची फलंदाजी पाहत होतो तेव्हा डॉक्टरांनी मला बोलावलं.., विराटने सांगितला 'तो' किस्सा - virat kohli on ind vs aus test

मी रुग्णालयात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना मोबाईलवर पाहत होते. शार्दुल ठाकूर आणि वॉशिग्टन सुंदर ही जोडी फलंदाजी करत होती. तेव्हा अचानक डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवले, अशी आठवण विराटने सांगितली.

virat kohli reveals how he stayed connected with team india
शार्दुल-सुंदरची फलंदाजी पाहत होतो तेव्हा डॉक्टरांनी मला बोलावलं.., विराटने सांगितलं 'तो' किस्सा
author img

By

Published : Feb 4, 2021, 7:57 PM IST

चेन्नई - भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर पॅटर्निटी लिव्हवर भारतात परतला. त्यावेळी भारतीय संघ चार सामन्याच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर होता. विराट परतल्यानंतर संघाची धुरा अजिंक्य रहाणेकडे आली. तेव्हा अजिंक्यने कुशल नेतृत्व करत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यादरम्यान, विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिने ११ जानेवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता विराटने तो कशाप्रकारने संघासोबत जोडला गेलेला होता, याचा खुलासा केला आहे.

मी रुग्णालयात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना मोबाईलवर पाहत होते. शार्दुल ठाकूर आणि वॉशिग्टन सुंदर ही जोडी फलंदाजी करत होती. तेव्हा अचानक डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवले, अशी आठवण विराटने सांगितली. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळत होता. तेव्हा विराट, पत्नी अनुष्कासह रुग्णालयात होता.

बाप बनणे आणि भारतीय संघाचा विजय या दोन्हीची तुलना होऊ शकत नाही. बाप बनणे हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे आणि पुढे देखील राहिल, असे देखील विराट म्हणाला.

दरम्यान, भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यानंतर आता भारताला इंग्लंडविरुद्ध मायदेशात दोन हात करायचे आहेत. उभय संघातील कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्वाची आहे. यामुळे दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा - Ind vs Eng : पाहुण्या संघाला जबर धक्का; पहिल्या २ कसोटीतून बाहेर पडला सलामीवीर

हेही वाचा - IND VS ENG : जो रूट म्हणतो, विराट नव्हे तर 'या' खेळाडूची विकेट आमच्यासाठी महत्वाची

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.