नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फिटनेसबाबत नेहमीच जागृत असतो. तो जगभरात फिटनेटमुळे चर्चेत असतो. यामुळे जगभरातील क्रिकेटपटू विराटपासून प्रेरणा घेतात. भारतीय संघ सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. विराटने या दौऱ्यात आपल्या इस्टाग्रामवर अकाऊंटवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विराटने जिममधील वर्कआउटचे व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील पहिल्या व्हिडिओत तो एक स्टंट करत असल्याचे दिसत आहे. जिममध्ये विराटच्या समोर दोन बॉक्स ठेवले आहेत. विराट त्या बॉक्सवर उडी मारताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या व्हिडिओत तो जिममधील मोठ्या वजनाचे डंबेल्स उचलताना पाहायला मिळत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विराटच्या या व्हिडिओवर चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात टी-२० मालिका खेळत आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना उद्या (२९ जानेवारी रोजी) होणार आहे.
भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक -
टी-२० मालिका -
- पहिली टी-२० : ऑकलंड - २४ जानेवारी २०२०
- दुसरी टी-२० : ऑकलंड - २६ जानेवारी २०२०
- तिसरी टी-२० : हॅमिल्टन - २९ जानेवारी २०२०
- चौथी टी-२० : वेलिंग्टन - ३१ जानेवारी २०२०
- पाचवी टी-२० : माऊंट माउंगानुई - ०२ फेब्रुवारी २०२०
असा आहे भारतीय टी-२० संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार ), संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दूबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर.
हेही वाचा - यंदाच्या आयपीएल स्पर्धेत 'हे' दोन नवीन नियम होणार लागू
हेही वाचा - IPL २०२० : ठरलं तर.. फायनलचा थरार रंगणार मुंबईत.. ही आहे तारीख