ETV Bharat / sports

आम्ही खोटे नाही, असे का म्हणतोय विराट वाचा... - विराटने अनुष्कासोबतचे फोटो केले शेअर

गुरुवारी विराटने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनुष्कासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने, भलेही आमचे हास्य खोटं असेल पण आम्ही खोटे नाही, असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

virat kohli posts pictures with anushka sharma says our smiles maybe fake but we are not
आम्ही खोटे नाही, असे का म्हणतोय विराट वाचा...
author img

By

Published : Apr 2, 2020, 5:55 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू कोरोनाच्या वाढलेल्या धोक्यामुळे घरात आहेत. घरी असूनही खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी वार्तालाप करत आहेत. अनेक खेळाडूंनी यांच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृतीही केली आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने, भलेही आमचे हास्य खोटे वाटत असेल. पण आम्ही खोटे नाही, असे म्हटले आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे खेळाडू आपापल्या घरी कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. विराट, पत्नी अनुष्कासोबत वेळ व्यतित करत आहे. त्याने गुरुवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनुष्कासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने, भलेही आमचे हास्य खोटं असेल पण आम्ही खोटे नाही, असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

शेअर केलेल्या फोटोत विराट-अनुष्का हसताना दिसत आहेत. दरम्यान या फोटोसोबत विराटने आपल्या चाहत्यांना घराबाहेर पडू नका, असे आवाहनदेखील केले आहे. त्याने यासाठी घरातच राहा, तंदुरूस्त राहा आणि सुरक्षित राहा, असे हॅशटॅग वापरले आहेत.

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ४७ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरामध्ये गेल्या १२ तासात तब्बल १३१ नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ९६५ वर पोहोचली आहे. यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा - जगात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना, न्यूझीलंडच्या फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा

हेही वाचा - लढा कोरोनाविरुद्धचा : गंभीरने ठेवला खासदारांसमोर आदर्श, दिला २ वर्षांचा पगार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.