ETV Bharat / sports

अंबाती रायडू विषयी कर्णधार कोहली म्हणाला..... अन झाला ट्रोल - indian

भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने हा निर्णय विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याने घेतला असल्याचे बोलले जात आहे. रायडूच्या निवृत्तीवर भारतीस संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, तू चांगला माणूस आहे. यानंतर सोशल मीडियावर कर्णधार कोहलीला ट्रोल करण्यात येत आहे.

अंबाती रायडू विषयी कर्णधार कोहली म्हणाला..... अन झाला ट्रोल
author img

By

Published : Jul 4, 2019, 4:32 PM IST

Updated : Jul 4, 2019, 5:00 PM IST

लंडन - भारतीय संघातील मधल्या फळीतला फलंदाज अंबाती रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने हा निर्णय विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात निवड न झाल्याने घेतला असल्याचे बोलले जात आहे. रायडूच्या निवृत्तीवर भारतीस संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, तू चांगला माणूस आहे. यानंतर सोशल मीडियावर कर्णधार कोहलीला ट्रोल करण्यात येत आहे.

  • Wish you the best going forward Ambati. You're a top man 👊🙂👏@RayuduAmbati

    — Virat Kohli (@imVkohli) July 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अंबाती रायडूला वगळण्यात आले. तेव्हा रायडूने उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर स्पर्धेत शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाल्याने त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. यानंतर तरी रायडूची संघात वर्णी लागणार का? अशी चर्चा होती. मात्र, रायडूच्या ठिकाणी मयांक अग्ररवाल याला संधी देण्यात आली. तेव्हा नाराज असलेल्या रायडूने सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.

रायडूच्या निर्णयानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने निवड समितीवर तासोरे आढले. त्यांनी निवड समितीत अर्धवट करिअर झालेले लोक बसले असल्याची टीका केली. तसेच काहींनी तर रायडूला निवड समितीने सवतीसारखी वागणूक दिली असल्याचा गंभीर आरोप केला. मात्र, यावर कर्णधार कोहली यांने अंबाती रायडूला शुभेच्छा दिल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

अंबाती रायुडूने भारताकडून 6 टी-20 सामन्यामध्ये खेळताना 42 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 97 सामन्यांत 45.56 च्या सरासरीने 6151 धावा केल्या आहे. त्यात 16 शतके व 34 अर्धशतकांचा समावेश आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 4, 2019, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.