ऑकलंड - न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा २२ धावांनी पराभव झाला. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २७३ धावा केल्या होत्या. भारताला हे आव्हान पेलवले नाही. भारताचा संपूर्ण संघ ४८.३ षटकात सर्वबाद २५१ धावा करु शकला. दरम्यान, या सामन्यात विराट कोहली पंचांच्या निर्णयावर संताप व्यक्त करताना दिसून आला.
घडले असे की, न्यूझीलंडविरुद्ध १७ वे षटक युझवेंद्र चहलने टाकले. या षटकाच्या ५ व्या चेंडूनंतर पंचांनी फलंदाज हेन्री निकोलसला एलबीडब्ल्यू आऊट असल्याचे घोषित केले. तेव्हा निकोलसने रिव्ह्यू घेण्यापूर्वी त्याचा जोडीदार मार्टिन गुप्टिल याच्याशी चर्चा केली आणि जेव्हा त्याने रिव्ह्यूसाठी इशारा केला तेव्हा टाइमरमधील वेळ शून्य दाखवली जात होती. म्हणजेच रिव्ह्यूसाठी देण्यात आलेली वेळ संपली होती. यावरुन कर्णधार विराट कोहली चांगलाच चिडला त्याने पंचांशी हुज्जत घातली.
दरम्यान, डीआरएस नियमानुसार रिव्ह्यू घेण्यासाठी १५ सेकंदाचा वेळ असतो. पण निकोलसने ज्यावेळी रिव्ह्यू मागितला तेव्हा ती वेळ संपली होती. विराटने मैदानात पंचांनी रिव्ह्यूला मान्यता दिल्याने नाराजी दर्शवली. हा निर्णय भारतीय संघाच्या बाजूने असल्यामुळे जास्त वाद झाला नाही.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी विजयी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा सामना ११ फेब्रुवारीला खेळला जाईल.
हेही वाचा - IND vs NZ : एकदिवसीय मालिकेत भारताचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली
हेही वाचा - बुमराहची जादू ओसरली, मागील ५ सामन्यात मिळवला फक्त...