मुंबई - न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटीतही व्हाईटवॉश मिळाल्यानंतर टीम इंडियाचे 'तारे जमीन पर' आले. या दौऱ्यानंतर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनीही विराटच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांनी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाचे करिअर विराटने खराब केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना पाटील म्हणाले, 'तुम्ही ऋषभ पंतला संधी देताना वृद्धिमान साहाच्या करिअरसोबत खेळत आहात. परदेशात आपल्याला अनुभवी यष्टीरक्षकाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे साहा हा पहिली पसंती असायला हवा होता.'
अनेकदा गरजेच्या वेळी साहाने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मग तुम्ही त्याचा आत्मविश्वास कमी का करत आहात? साहाची गुणवत्ता काय आहे, मला माहिती आहे. त्याने वेस्ट इंडिजमध्ये शतक झळकावले होते. त्यावेळी मी तिथे होतो, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, पंतला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने गरजेच्या वेळी बेजबाबदार फटकेबाजी करत विकेट फेकली.
हेही वाचा - Women's T२० WC : भारत-इंग्लंड उपांत्य झुंज, जाणून घ्या हवामान अंदाज अन् बरचं काही...
हेही वाचा - IND VS ENG : शेफाली नव्हे 'ही' सर्वात धोकादायक, इंग्लंडच्या कर्णधाराची वाढू लागली भीती