पोर्ट ऑफ स्पेन - आज वेस्ट इंडिज आणि टीम इंडियामध्ये दुसरा एकदिवसीय सामना रंगतो आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विराटने फक्त १९ धावा करत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा विक्रम मोडला आहे.
विराटने पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादचा विक्रम मोडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा जावेद मियांदादने केल्या होत्या. पण, आता विराटने त्याला पछाडले आहे.
मियांदादने विडिंजविरुद्ध ६४ डावांत एकूण १९३० धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या एक शतकाचा आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. आजच्या सामन्याआधी, विराटने विडिंजविरुद्ध ३३ डावांमध्ये १९१२ धावा केल्या होत्या. यामध्ये विराटच्या सात शतकांचा आणि १० अर्धशतकांचा समावेश होता.
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे पहिले पाच फलंदाज -
- विराट कोहली (भारत) - १९४४* धावा
- जावेद मियांदाद (पाकिस्तान) - १९३० धावा
- मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) - १७०८ धावा
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - १६६६ धावा
- रमीझ राजा (पाकिस्तान) - १६२४ धावा