नवी दिल्ली - टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. कर्णधार विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विंडीजविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. या मालिकेनंतर, विराटसेना विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाने विंडीजविरुद्धची पहिली कसोटी जिंकली तर विराट महेद्रसिंह धोनीच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी करणार आहे.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना जिंकला तर, धोनीच्या कसोटीतील सर्वाधिक विजयी सामन्यांशी विराट बरोबरी करणार आहे. कर्णधार म्हणून धोनीने कसोटीत ६० सामन्यांपैकी २७ सामने जिंकले आहेत. तर, विराटने ४६ सामन्यांतच २६ विजय संपादन केले आहेत.
विराटने एकदिवसीय संघापूर्वी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, विराटला कसोटीचे कर्णधारपद सोपवले गेले. आपल्या कर्णधारपदाच्या काळात, विराटने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये विजय मिळवला आहे. तर, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये त्यांना पराभव स्वीकाराला लागला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षी, ऑस्ट्रेलियामध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. तब्बल ७१ वर्षांनी भारताला हा विजय साकारता आला होता.