ETV Bharat / sports

''विराट मशीन नसून एक माणूस असल्याचे लोक विसरले आहेत''

विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी आयपीएलमधील पंजाबविरुद्धच्या विराटच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''विराटने स्वत: साठी असे उच्च मापदंड ठेवले आहेत, की प्रत्येक वेळी मैदानावर त्याने चांगली कामगिरी करावी अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. विराट हा मशीन नव्हे तर एक माणूस आहे हे लोक विसरले आहेत.''

author img

By

Published : Sep 27, 2020, 6:11 PM IST

virat kohli is human not a machine says his childhood coach rajkumar sharma
''विराट मशीन नसून एक माणूस असल्याचे लोक विसरले आहेत''

दुबई - आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका झाली. विराटने या सामन्यात क्षेत्ररक्षणात आणि फलंदाजीत सुमार कामगिरी केली. चाहत्यांनीही विराटच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सामन्यानंतर विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजकुमार शर्मा म्हणाले, ''प्रत्येक खेळाडूचा मैदानावर चांगला आणि वाईट दिवस असतो आणि त्यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. विराटने स्वत: साठी असे उच्च मापदंड ठेवले आहेत, की प्रत्येक वेळी मैदानावर त्याने चांगली कामगिरी करावी अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. हा खेळाडूंच्या जीवनाचा एक भाग आहे. खेळपट्टीवर तुमच्यासाठी चांगले आणि वाईट दिवस आहेत. विराट हा मशीन नव्हे तर एक माणूस आहे हे लोक विसरले आहेत.''

शर्मा म्हणाले, ''या गोष्टी होतातच. कोणाकडूनही एक किंवा दोन झेल सुटू शकतात. जाँटी ऱ्होड्सकडूनसुद्धा झेल सुटले होते. दिग्गज क्षेत्ररक्षक असलेल्या जावेद मियांदादकडूनही झेल सुटले आहेत. त्यामुळे मैदानावरचा हा एक वाईट दिवस होता, जो कदाचित सर्वोत्कृष्टही ठरला असता. त्याने टिकून राहण्यासाठी पुरेसे क्रिकेट खेळले आहे.''

आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरू असा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने बंगळुरूसमोर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. तर, विराटच्या नेतृत्वातील बंगळुरूचा संघ १७ षटकांत १०९ धावांतच गारद झाला. विराटने शतक झळकावलेल्या पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे दोन झेल सोडले. तर, फलंदाजीतही विराट एका धावेवर माघारी परतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.