ETV Bharat / sports

जलदगती गोलंदाज उदानाने सांगितले सर्वोत्तम फलंदाज नाव

author img

By

Published : Jan 16, 2021, 9:32 AM IST

इसरू उदाना यंदा अबुधाबी टी-१० लीगमध्ये बांगला टायगर्सकडून खेळेल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मर्यादित षटकांत सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे उदानाने सांगितले.

जलदगती गोलंदाज उदानाने सांगितले सर्वोत्तम फलंदाज नाव
जलदगती गोलंदाज उदानाने सांगितले सर्वोत्तम फलंदाज नाव

अबुधाबी - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इसरू उदानाने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या मर्यादित षटकांत सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले आहे. "मला वाटते विराट कोहली मर्यादित षटकांचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मी मिशेल स्टार्कचे नाव घेईन. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी मी रवींद्र जडेजाची निवड करेन", असे उदानाने सांगितले.

इसरू उदाना यंदा अबुधाबी टी-१० लीगमध्ये बांगला टायगर्सकडून खेळेल. २८ जानेवारीला शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर जेव्हा उदाना मैदानात उतरेल तेव्हा त्याचा सामना ख्रिस गेलशी होईल. गेलच्या विरोधात योजना राबविणे महत्त्वाचे असल्याचे उदानाने सांगितले.

तो म्हणाला, "जेव्हा आपण युनिव्हर्स बॉसला सामोरे जाऊ, तेव्हा आपण आपली योजना चांगल्या प्रकारे राबवावी लागेल. म्हणूनच मी माझ्या योजनेचा विचार करीत आहे आणि मला माझी योजना अंमलात आणायची आहे."

हेही वाचा - गाबा कसोटी : ३६९ धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.