ETV Bharat / sports

विराटने दादाला टाकले मागे, 'हा' विक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय फलंदाज

विराट आता सर्वाधिक धावा करणाऱया भारतीय फलंदाजांमध्ये दुसरा ठरला आहे.

विराटने दादाला टाकले मागे, 'हा' विक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय फलंदाज
author img

By

Published : Aug 12, 2019, 12:10 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. रन मशीन समजला जाणारा विराट आता सर्वाधिक धावा करणाऱया भारतीय फलंदाजांमध्ये दुसरा ठरला आहे.

विराटने २३८ एकदिवसीय सामन्यात ११४०६ धावा केल्या आहेत. तर, सौरव गांगुलीने ३०० एकदिवसीय सामन्यात ११३६३ धावा जमवल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर विराजमान आहे. सचिनने ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत. विराटचा फॉर्म असाच राहिल्यास भविष्यात तो सचिनचाही विक्रम मोडू शकतो.

कर्णधार कोहलीने विंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याने १२५ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकारासह १२० धावा केल्या. या सामन्यात ७८ धावा करताच, त्याने दादाचा विक्रम मोडित काढला. शिवाय, वेस्ट इंडिजविरुद्ध २००० धावा करणारा कोहली जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

Intro:Body:

विराटने दादाला टाकले मागे, 'हा' विक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय फलंदाज

पोर्ट ऑफ स्पेन - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. रन मशीन समजला जाणारा विराट आता सर्वाधिक धावा करणाऱया भारतीय फलंदाजांमध्ये दुसरा ठरला आहे.

विराटने २३८ एकदिवसीय सामन्यात ११४०६ धावा केल्या आहेत. तर, सौरव गांगुलीने ३०० एकदिवसीय सामन्यात ११३६३ धावा जमवल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर विराजमान आहे. सचिनने ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत. विराटने अशीच चांगल्या पद्धतीने कामगिरी केली तर, भविष्यात तो सचिनचाही विक्रम मोडू शकतो. 

कर्णधार कोहलीने विंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार शतक झळकावले. त्याने १२५ चेंडूत १४ चौकार आणि एका षटाकारासह १२० धावा केल्या. या सामन्यात ७८ धावा करताच, त्याने दादाचा विक्रम मोडला आहे. शिवाय, वेस्ट इंडिजविरुद्ध २००० धावा करणारा कोहली जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.