ETV Bharat / sports

आयसीसीच्या क्रमवारीत विराट-रोहितचे राज्य - एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी

एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात ९० आणि तिसऱ्या सामन्यात ९२ धावांची नाबाद खेळी करणारा हार्दिक पांड्या पहिल्यांदा ५० स्थानांमध्ये पोहोचला आहे. ५५३ गुणांसह तो ४९व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडून एकदिवसीय मालिकेत अनुक्रमे ११४, ६० आणि ७५ धावा करणारा कर्णधार आरोन फिंच पाचव्या स्थानावर आहे.

virat kohli and rohit sharma stands tall in odi rankings
आयसीसीच्या क्रमवारीत विराट-रोहितचे राज्य
author img

By

Published : Dec 11, 2020, 7:09 AM IST

सिडनी - आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी आपले स्थान कायम राखले आहे. विराट पहिल्या तर, रोहित दुसऱ्या स्थानी आहे.

आयसीसीच्या क्रमवारीत विराट-रोहितचे राज्य

हेही वाचा - इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा, पुण्यात रंगणार तीन सामने

एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात ९० आणि तिसऱ्या सामन्यात ९२ धावांची नाबाद खेळी करणारा हार्दिक पांड्या पहिल्यांदा अव्वल ५० स्थानांमध्ये पोहोचला आहे. ५५३ गुणांसह तो ४९व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडून एकदिवसीय मालिकेत अनुक्रमे ११४, ६० आणि ७५ धावा करणारा कर्णधार आरोन फिंच पाचव्या स्थानावर आहे.

स्टीव्ह स्मिथची कमाल -

मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात ६२-६२ चेंडूत दोन शतके करणारा स्टीव्ह स्मिथ अव्वल २०मध्ये परतला आहे. ७०७ गुणांसह तो १५व्या स्थानावर आहे. एकदिवसीय मालिकेच्या तीन सामन्यात १९४.१८च्या स्ट्राईक रेटने १६७ धावा करणारा ग्लेन मॅक्सवेल २०व्या स्थानी आला आहे.

तर, गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह तिसर्‍या क्रमांकावर आहे. फलंदाजांनी गाजवलेल्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या अ‌ॅडम झम्पाने मोठा प्रभाव पाडला. तो प्रथमच टॉप-२० मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. झम्पा ६२३ गुणांसह १४व्या स्थानावर आहे. जोश हेझलवुड ६व्या स्थानावर आहे.

virat kohli and rohit sharma stands tall in odi rankings
जसप्रीत बुमराह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.