दुबई - आयसीसीकडून आज ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीच आणि जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
फलंदाजांच्या जागतीक क्रमवारीत विराटसह भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर रॉस टेलर तिसऱ्या स्थानी आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या १० गोलंदाजांमध्ये ३ भारतीयांचा समावेश आहे. यात जसप्रीत बुमराह पहिल्या, कुलदीप यादव सहाव्या तर यजुवेंद्र चहल आठव्या स्थानी आहेत.
अष्टपैलु खेळाडूंच्या यादित अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशीद खान ३५६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
फलंदाजांची जागतिक क्रमवारी
१) विराट कोहली - ८९० गुण
२) रोहित शर्मा - ८३९ गुण
३) रॉस टेलर - ८३० गुण
गोलंदाजांची जागतिक क्रमवारी
१) जसप्रीत बुमराह - ७७४ गुण
२) ट्रेंट बोल्ट - ७५९ गुण
३) राशीद खान - ७४७ गुण