किंग्स्टन - सबीना पार्क येथे रंगलेल्या विंडीजविरुद्धच्या अंतिम कसोटी टीम इंडियाने २५७ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयाबरोबर कर्णधार कोहलीने भारताच्या कॅप्टन कुलचा मोठा विक्रम मोडला आहे.
हेही वाचा - 'दंगल गर्ल'ने दिली गोड बातमी दिली, लवकरच होणार आई
विराट कोहली आता भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून त्याने सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या धोनीच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विंडीजविरुद्धचा विजय हा विराटचा कसोटीतील २८ वा विजय ठरला. भारताचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीने कर्णधार म्हणून २७ कसोटी विजय मिळवले आहेत.
-
Virat Kohli now has more Test wins (28) than any other Indian captain 🏆#WIvIND pic.twitter.com/AQKUD1c9HT
— ICC (@ICC) September 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Virat Kohli now has more Test wins (28) than any other Indian captain 🏆#WIvIND pic.twitter.com/AQKUD1c9HT
— ICC (@ICC) September 2, 2019Virat Kohli now has more Test wins (28) than any other Indian captain 🏆#WIvIND pic.twitter.com/AQKUD1c9HT
— ICC (@ICC) September 2, 2019
कसोटीमध्ये विराटने आत्तापर्यंत ४८ सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. यामध्ये त्याने २८ विजय तर १० सामन्यात पराभव स्विकारले आहेत. या व्यतिरिक्त १० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघावर तब्बल २५७ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांची कामगिरी महत्त्वपुर्ण ठरली असून रविंद्र जडेजा व मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ तर इशांत शर्माने व बुमराहने १ गडी बाद केला.
कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार -
- २८ - विराट कोहली (४८ सामने)
- २७ - एमएस धोनी (६० सामने)
- २१ - सौरव गांगुली (४९ सामने)
- १४ - मोहम्मद अझरुद्दीन (४७ सामने)
- ९ - सुनील गावस्कर (४७ सामने)
- ९ - मन्सुर अली पतौडी (४० सामने)