चेन्नई - यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतून भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. त्याने या स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची किमया केली होती. आता शंकरने त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.
सध्या सुरू असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेतून शंकरने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. शंकरने चेपॉक सुपर गिलीज संघाकडून खेळताना आपल्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज आकाश सिवानला बाद करत मोठा धक्का दिला. या सामन्यात शंकरने दोन बळी घेतले आहेत.
-
He's making a habit of this, isn't he?😀
— TNPL (@TNPremierLeague) August 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
After a dream #CWC19 debut, @vijayshankar260 struck with his first ever delivery in his maiden #TNPL outing as @supergillies secured qualification for the playoffs! #NammaPasangaNammaGethu #TNPL2019 #CSGvTP pic.twitter.com/2SkgyQe0QC
">He's making a habit of this, isn't he?😀
— TNPL (@TNPremierLeague) August 10, 2019
After a dream #CWC19 debut, @vijayshankar260 struck with his first ever delivery in his maiden #TNPL outing as @supergillies secured qualification for the playoffs! #NammaPasangaNammaGethu #TNPL2019 #CSGvTP pic.twitter.com/2SkgyQe0QCHe's making a habit of this, isn't he?😀
— TNPL (@TNPremierLeague) August 10, 2019
After a dream #CWC19 debut, @vijayshankar260 struck with his first ever delivery in his maiden #TNPL outing as @supergillies secured qualification for the playoffs! #NammaPasangaNammaGethu #TNPL2019 #CSGvTP pic.twitter.com/2SkgyQe0QC
या स्पर्धेत, टुटी पेट्रीयोट्स विरुद्ध चेपॉक सुपर गिलीज असा सामना रंगला होता. चेपॉकच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १२७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टुटी पेट्रीयोट्सचा संघ ९५ धावांवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे शंकरनेच, पेट्रीयोट्सच्या सर्वात शेवटच्या फलंदाजाला बाद केले.
या सामन्यात शंकरला फलंदाजीत चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्याने ७ चेंडूत ३ धावा केल्या.