मुंबई - भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर विवाहबंधनात अडकला आहे. त्याने वैशाली विश्वेश्वरनसोबत बुधवारी (ता. २७) लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला विजय आणि वैशाली यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता. दोघांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. विजयच्या लग्नाचे फोटो आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबादने शेअर केले आहेत.
विजय आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे. यामुळे त्याच्या लग्नातील फोटो शेअर करत सनरायझर्सने शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही विजय शंकरला त्याच्या आयुष्यातील खास दिवसाबद्दल शुभेच्छा देतो. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी रहावे, अशा शुभेच्छा, सनरायझर्सने दिल्या आहेत. दरम्यान, विजयने मागील वर्षी ऑगस्टमध्ये वैशालीबरोबर साखरपुडा केला होता.
-
Sending our best wishes to @vijayshankar260 on this very special day!
— SunRisers Hyderabad (@SunRisers) January 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
May you have a happy and blessed married life 🧡😁#SRHFamily #OrangeArmy #SRH pic.twitter.com/elDUYKVww2
">Sending our best wishes to @vijayshankar260 on this very special day!
— SunRisers Hyderabad (@SunRisers) January 27, 2021
May you have a happy and blessed married life 🧡😁#SRHFamily #OrangeArmy #SRH pic.twitter.com/elDUYKVww2Sending our best wishes to @vijayshankar260 on this very special day!
— SunRisers Hyderabad (@SunRisers) January 27, 2021
May you have a happy and blessed married life 🧡😁#SRHFamily #OrangeArmy #SRH pic.twitter.com/elDUYKVww2
विजय शंकरने भारतीय संघाकडून १२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने २२३ धावांसह ४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २०१८ साली मे महिन्यात श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळताना १०१ धावा केल्या आहेत. तसेच टी-२० मध्ये त्याच्या नावे ५ विकेट्स आहेत. त्याने आयपीएलमध्ये ४० सामने खेळले असून यात त्याने ६५४ धावांसह ६ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा - VIDEO : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली चेन्नईत दाखल
हेही वाचा - अजिंक्य रहाणेचा लेकीसोबत डान्स, पाहा व्हिडिओ