बडोदा - विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी बडोदा संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
बडोद्याने ५० षटकांच्या चॅम्पियनशीपसाठी २२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या कृणालकडे कर्णधारपद तर केदार देवधरकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे, याची माहिती बडोदा क्रिकेट संघाचे सचिव अजित लेले यांनी दिली.
कृणाल पांड्याने नुकतीच पार पडलेली मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतून माघार घेतली होती. कृणालच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे त्याने स्पर्धेच्या सुरूवातीलाच माघार घेण्याचा निर्णय घेतला.
विजय हजारे करंडक स्पर्धेत बडोद्याच्या फलंदाजीची कमान विष्णू सोलंकी, अभिमन्यु सिंह राजपूत, युवा यष्टीरक्षक स्मिट पटेल आणि बाबासफी पठाण यांच्यावर आहे. तर अतीत शेठ, लुकमान मोरीवाला, निनाद रथवा, कार्तिक ककडे आणि भार्गव भट्ट यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी आहे.
बडोदा संघाचा विजय हजारे करंडक स्पर्धेत एलीट ग्रुप ए मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये बडोद्यासमोर गुजरात, छत्तीसगड, हैदराबाद, त्रिपूरा आणि गोवा या संघाचे आव्हान आहे. बडोदा संघाचे सर्व सामने सूरतमध्ये होणार आहेत.
हेही वाचा - विजय हजारे करंडकासाठी मुंबई संघाची घोषणा, अय्यरकडे संघाची कमान
हेही वाचा - ICC Test Ranking : विराटची मोठी घसरण, रुटची झेप