मुंबई - विजय हजारे करंडक स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना मुंबई आणि कर्नाटक यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना गुजरात आणि उत्तर प्रदेश यांच्यात खेळला जाईल.
मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील सामना उद्या गुरुवारी (११) होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला आहे. यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल या स्पर्धेत सुसाट फॉर्मात आहे. त्याने या स्पर्धेत सलग चार शतकं झळकावली आहेत. तर दुसरीकडे मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ देखील लयीत आहे. उद्याच्या सामन्यात या दोघांच्या कामगिरीवर खास नजर आहे.
कर्नाटक संघाकडे मनीष पांडे, वेगवान गोलंदाज रोनित मोरे, एम प्रसिद्ध कृष्णा, अष्टपैलू श्रेयस गोपाळ आणि फिरकीपटू के गौतम हे खेळाडू आहेत. तर दुसरीकडे कर्णधार श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर या सारख्या नावाजलेल्या अनुभवी खेळाडूंचा भरणा मुंबई संघात आहे.
हेही वाचा - टी-२० रॅकिंगमध्ये टीम इंडियाची उडी; ICC ने जारी केली ताजी क्रमवारी
हेही वाचा - IND VS ENG : हार्दिक म्हणतोय.. तयारी झाली आहे, मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही