ETV Bharat / sports

प्रकृती ठीक नसल्याने ट्रेंट बोल्ट सरावासाठी गैरहजर - boult in training camp news

न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलरने बोल्ट लवकरच परतण्याची आशा व्यक्त केली आहे. सरावाच्या तिसऱ्या दिवशी तो परत येईल, असे टेलर म्हणाला. ''आठ षटके टाकल्यानंतर तो मला थकल्यासारखा वाटला. अलीकडच्या काळात जे काही घडत आहे, याबद्दल तुम्ही थोडे सावध असले पाहिजे. आशा आहे की लवकरच तो बरा होईल'', असेही टेलर म्हणाला.

unwell trent boult skips training camp at bay oval
प्रकृती ठीक नसल्याने ट्रेंट बोल्ट सरावासाठी गैरहजर
author img

By

Published : Jul 21, 2020, 12:28 PM IST

ऑकलंड - न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने माउंट माउंगानुई येथे कॅम्पच्या दुसर्‍या दिवशी सराव केला नाही. एका वृत्तानुसार, बोल्टची प्रकृती ठीक नसल्याने तो सरावाला अनुपस्थित होता.

न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलरने बोल्ट लवकरच परतण्याची आशा व्यक्त केली आहे. सरावाच्या तिसऱ्या दिवशी तो परत येईल, असे टेलर म्हणाला. ''आठ षटके टाकल्यानंतर तो मला थकल्यासारखा वाटला. अलीकडच्या काळात जे काही घडत आहे याबद्दल तुम्ही थोडे सावध असले पाहिजे. आशा आहे की लवकरच तो बरा होईल'', असेही टेलर म्हणाला.

आईसलँडमध्ये राहणारे न्यूझीलंड संघाचे पुरुष व महिला संघातील क्रिकेटपटू 19 ते 24 जुलै दरम्यान सरावासाठी बे ओव्हल येथे आहेत.

पुरुष संघ दोन भागात विभागलेला असल्याचे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन जगर्सन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "उत्तर आइसलँडमध्ये आमच्याकडे अधिक खेळाडू आहेत, भौगोलिकदृष्ट्या या गोष्टींचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच आम्ही या शिबिराचे दोन भागात विभाजन करत आहोत. आम्हाला या खेळाडूंबरोबर अधिकाधिक वेळ घालवायचा आहे. त्यांना तीन दिवसांत चांगली संधी दिली जाईल. मग आमच्याकडे दुसरा गट येईल."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.