ETV Bharat / sports

यूएईत रंगणाऱ्या आयपीएलसाठी 'ही' कंपनी असणार भागीदार - ipl 2020 official partners

बीसीसीआयने सांगितले, की तीन हंगामासाठी अनअ‌कॅडमी आयपीएलची भागीदार राहील. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले, ''२०२० ते २०२२ पर्यंत आयपीएलची अधिकृत सहकारी म्हणून अनअ‌कॅडमीची निवड करण्यात आम्हाला आनंद झाला आहे. आयपीएल ही भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. आमचा विश्वास आहे, की भारतीय शिक्षण कंपनी अनअ‌कॅडमी प्रेक्षक म्हणून लोकांच्या आकांक्षेवर खूप सकारात्मक परिणाम घडवून आणू शकते. विशेषत: कोट्यावधी तरुण जे आपले करिअर बनवण्यात गुंतले आहेत."

unacademy becomes the official partner of ipl 2020
यूएईत रंगणाऱ्या आयपीएलसाठी 'ही' कंपनी असणार भागीदार
author img

By

Published : Aug 30, 2020, 10:33 AM IST

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गव्हर्निंग काउन्सिलने ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म अनअ‌कॅडमीला यंदाच्या आयपीएलसाठी अधिकृत भागीदार (ऑफिशियल पार्टनर) म्हणून घोषणा केली. आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईत रंगणार आहे.

बीसीसीआयने सांगितले, की तीन हंगामासाठी अनअ‌कॅडमी आयपीएलची भागीदार राहील. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले, ''२०२० ते २०२२ पर्यंत आयपीएलची अधिकृत सहकारी म्हणून अनअ‌कॅडमीची निवड करण्यात आम्हाला आनंद झाला आहे. आयपीएल ही भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. आमचा विश्वास आहे, की भारतीय शिक्षण कंपनी अनअ‌कॅडमी प्रेक्षक म्हणून लोकांच्या आकांक्षेवर खूप सकारात्मक परिणाम घडवून आणू शकते. विशेषत: कोट्यावधी तरुण जे आपले करिअर बनवण्यात गुंतले आहेत."

अनअकॅडमीने सांगितले, ''या भागीदारीमुळे आम्ही खूप खूश आहोत. अनअ‌कॅडमीचा एक मोठा ब्रँड असून त्याने शिक्षण व शिक्षणातील नवकल्पनांच्या सहाय्याने सर्व मर्यादा तोडल्या आहेत.''

आयपीएलसाठी यूएई गाठलेल्या सर्व संघांतील खेळाडूंची चाचणी झाली असून त्यात १३जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या संक्रमित सदस्यांमध्ये दोन खेळाडू असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने हा शनिवारी खुलासा केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.