ETV Bharat / sports

क्रिकेटच्या मैदानावर स्वत:चे 'संरक्षण' करणाऱ्या पंचाची निवृत्ती - ब्रुस ऑक्सनफोर्ड लेटेस्ट न्यूज

जानेवारी २००६ मधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यात ऑक्सनफोर्ड यांनी पहिल्यांदा काम पाहिले. मागील तीन पुरुष विश्वकरंडक आणि तीन टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले आहे. ते २०१२ आणि २०१४च्या महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतही पंच होते.

Umpire Bruce Oxenford
क्रिकेटच्या मैदानावर स्वत:चे 'संरक्षण' करणाऱ्या पंचाची निवृत्ती
author img

By

Published : Jan 29, 2021, 1:15 PM IST

दुबई - तब्बल पंधरा वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचगिरी करणाऱ्या ब्रुस ऑक्सनफोर्ड यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. २०१२ पासून आयसीसीच्या एलिट पॅनेलचे नियमित सदस्य असलेल्या ऑक्सनफोर्ड यांनी ६२ कसोटी सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. ब्रिस्बेनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक कसोटी सामन्यात ऑक्सनफोर्ड यांनी पंच म्हणून काम पाहिले होते. क्रिकेटच्या मैदानावर स्वत:चे 'संरक्षण' करण्यासाठी ऑक्सनफोर्ड आपल्या डाव्या हातात एका 'डिश' घालत होते.

हेही वाचा - दुसऱ्या अँजिओप्लास्टीला सामोरा गेला बीसीसीआयचा 'बॉस'

६० वर्षीय ऑक्सनफोर्ड यांनी आयसीसीला सांगितले की, मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा पंच म्हणून अभिमान बाळगतो. २०० आंतरराष्ट्रीय सामन्यांत मी पंच म्हणून काम पाहिले आहे, यावर माझा विश्वास नाही. मी इतके दिवस काम करण्याची कधी कल्पनाही केली नव्हती. मी आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी एलिट आणि आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला प्रोत्साहित केले."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.