नवी दिल्ली - त्रिपुराच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघातील खेळाडू अयंती रेंग तिच्या घरी मृतावस्थेत आढळली. एका दैनिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, 16 वर्षीय अंयती मंगळवारी रात्री फाशी घेतलेल्या स्थितीत आढळून आली. मात्र तिच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
चार भाऊ-बहिणींपैकी सर्वात धाकटी असलेली अयंती मागील एका वर्षापासून त्रिपुराच्या 19 वर्षांखालील महिला संघाची सदस्य होती. तिने 23 वर्षांखालील टी-20 स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.
अयंती राजधानी आगरताळापासून 90 कि.मी. अंतरावर असलेल्या उदयपुरमधील तेनानी गावची आहे. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी तैमुरा चंदा यांनी अयंती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्याने एक हुशार खेळाडू गमावला आहे, असे चंदा यांनी म्हटले.