नवी दिल्ली - शनिवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला सहज नमवत प्लेऑफचे स्थान भक्कम केले. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉला माघारी धाडले. या कामगिरीनंतर बोल्ट पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. बोल्टने आयपीएल-१३ मधील पॉवरप्लेमध्ये १२ बळी घेतले आहेत.
बोल्टनंतर राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने पॉवरप्लेमध्ये ९ गडी बाद केले आहेत. न्यूझीलंडच्या या गोलंदाजाने या हंगामात पहिल्या षटकात ५ बळी घेतले आहेत.
दिल्लीविरुद्ध सामन्यात बोल्टने पहिल्या षटकात धवनला बाद केले. ११ ऑक्टोबरला मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्यातही बोल्टने पहिल्या षटकातील तिसर्या चेंडूवर शॉला बाद केले. यंदा बोल्टच्या खात्यात २० बळींची नोंद झाली आहे. लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे तिसर्या क्रमांकावर आहे.