अबुधाबी - आयपीएलमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा सहज पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. भेदक गोलंदाजी आणि उत्तम फलंदाजीमुळे मुंबईने कोलकाताला ८ गड्यांनी मात दिली. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने खास कामगिरी केली.
-
50 @IPL wickets for Boulty ⚡️
— Mumbai Indians (@mipaltan) October 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Last 12 have come in the #MI Blue & Gold!#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvKKR pic.twitter.com/b0soBbt6z9
">50 @IPL wickets for Boulty ⚡️
— Mumbai Indians (@mipaltan) October 16, 2020
Last 12 have come in the #MI Blue & Gold!#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvKKR pic.twitter.com/b0soBbt6z950 @IPL wickets for Boulty ⚡️
— Mumbai Indians (@mipaltan) October 16, 2020
Last 12 have come in the #MI Blue & Gold!#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvKKR pic.twitter.com/b0soBbt6z9
या सामन्यात बोल्टने ३२ धावा देत १ बळी घेतला. या बळीसह बोल्टने आयपीएलमध्ये आपल्या ५० बळींचा टप्पा गाठला. ४१ सामन्यात बोल्टने ही कामगिरी नोंदवली. आयपीएलमध्ये ५० बळी घेँणारा बोल्ट हा ५०वा गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम मुंबईच्या लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. मलिंगाने १२२ सामन्यात १७० फलंदाजांना माघारी धाडले आहे.
बोल्टच्या कामगिरीव्यतिरिक्त मुंबईनेही एक जबरदस्त विक्रम नोंदवला आहे. मुंबईने कोणत्याही एका संघाविरुद्ध २०पेक्षा जास्त विजय नोंदवले आहेत. कोलकाताविरुद्ध मुंबईचा हा २१वा विजय होता. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणे कोणत्याही संघाला जमलेले नाही. दुसऱ्या क्रमांकावर कोलकाताचा संघ आहे. कोलकाताने पंजाबविरुद्ध १८ विजय नोंदवले आहेत. मुंबईने चेन्नईविरुद्ध १७ तर, विराटसेनेविरुद्ध १६ विजय मिळवले आहेत.