लंडन - क्रिकेट विश्वाला डकवर्थ-लुईस नियम देणारे गणिततज्ज्ञ टोनी लुईस यांचे निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. लुईस यांनी गणिततज्ज्ञ सहकारी फ्रँक डकवर्थ यांच्यासोबत मिळून डीएलएस नियम तयार केला. याचा पहिल्यांदा वापर १९९६-९७ साली झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान करण्यात आला. यानंतर याची संपूर्णत: अंमलबजावणी १९९९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकात करण्यात आली.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक निवदेनाद्वारे, लुईस यांच्या निधानावर दु:ख व्यक्त केले आहे. टोनी आणि फ्रँक यांचे योगदान कोणी विसरू शकत नाहीत. क्रिकेट विश्व त्यांचे सदैव ऋणी राहिल, असे ईसीबीने सांगितलं आहे.
क्रिकेटमध्ये एखाद्या सामन्यादरम्यान, पाऊस किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे अडथळा आला आणि त्यामुळे जर वेळ वाया गेला तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी डकवर्थ-लुईस नियमाचा वापर केला जातो. या नियमावर अनेक क्रिकेट चाहते नाराज असतात. कारण यामुळे अनेकदा चित्र-विचित्र असे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघाला मिळते.
डकवर्थ-लुईस नियम अनेक वेळा वादग्रस्त ठरला आहे. या नियमाला अनेक वेळा टीकेला सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये यात ऑस्ट्रेलियाचे गणिततज्ञ स्टिव्हन स्टर्न यांनी स्कोरिंग रेटनुसार बदल केले आहे. यामुळे तो डकवर्थ-लुईस-स्टर्न या नावाने ओळखला जाऊ लागला.
क्रिकेटमध्ये डीएलएस नियमाचा वापर करण्यात येण्याआधी, ज्या संघाने अधिक सरासरीने धावा केल्या असतील त्या संघाला विजयी घोषित करण्यात येत होते. पण यामध्ये किती गडी बाद झाले आहेत त्याचा विचार केला जात नव्हता.
WC २०११ : धोनीचा षटकार अन् भारताने जिंकला विश्वकरंडक, सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू
Video : रोहित पंतला म्हणाला.. संघात येऊन एक वर्ष झालं नाही अन् तु माझ्याशी पंगा घेतोस