ETV Bharat / sports

कोलकाताच्या संघात नवीन खेळाडूची 'एन्ट्री' , अमेरिकेच्या खेळाडूला केलं 'रिप्लेस'

हॅरी गुर्नीच्या जागी अली खानला कोलकाता संघात दाखल करण्यात आले होते. मात्र तो दुखापतीमुळे लीगमधून बाहेर पडला. आयपीएल संघासोबत करार करणारा अली खान हा अमेरिकेचा पहिला खेळाडू होता.

author img

By

Published : Oct 19, 2020, 3:08 PM IST

tim seifert to replace ali khan in kolkata knight riders
कोलकाताच्या संघात नवीन खेळाडूची 'एन्ट्री' , अमेरिकेच्या खेळाडूला केलं 'रिप्लेस'

दुबई - कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त अली खानच्या जागी न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टिम सिफेर्टबरोबर करार केला आहे. एका अहवालानुसार, सेफर्ट हा सीपीएलचा विजयी संघ असलेल्या त्रिनिबागो नाइट रायडर्सचा भाग होता. त्याला कोलकाताचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने बोलावले आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडमधील प्लंकेट शिल्डच्या पहिल्या दौर्‍यात सहभागी होणार नाही.

tim seifert to replace ali khan in kolkata knight riders
टिम सिफेर्ट

हॅरी गुर्नीच्या जागी अली खानला कोलकाता संघात दाखल करण्यात आले होते. मात्र तो दुखापतीमुळे लीगमधून बाहेर पडला. आयपीएल संघासोबत करार करणारा अली खान हा अमेरिकेचा पहिला खेळाडू होता. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सच्या संघात खान होता. या संघाने यंदाचे सीपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. अलीने या स्पर्धेत आठ सामन्यांत आठ विकेट्स घेतल्या, त्याची गोलंदाजीत धावांची सरासरी ७.४३ होती. एका वृत्तानुसार, केकेआरला गेल्या हंगामातही अलीला संधी द्यायची होती, पण त्याच्यासोबत करार होऊ शकला नाही.

अली खान

२०१८च्या ग्लोबल टी-२०मध्ये अली खानने सर्वांना प्रभावित केले होते. त्यावर्षी, खानने गयाना मेसन वॉरियर्सकडून १२ सामन्यांत १६ गडी बाद केले. २०१६मध्ये खानला ऑटी कप आणि आयसीसी डब्ल्यूसीएल विभाग चारसाठी यूएसए संघात स्थान देण्यात आले. सीपीएल पदार्पणात त्याने कुमार संगकाराला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.