ETV Bharat / sports

श्रीलंकेच्या तीन क्रिकेटपटूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप, लंकन क्रीडामंत्र्यांची माहिती

श्रीलंकेचे क्रीडामंत्री दुलास अलाहापेरुमा यांनी आपल्या देशातील तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये अडकले असल्याचे म्हटले आहे.

Three cricketers under ICC investigation for match-fixing: SL Sports Minister
श्रीलंकेच्या तीन क्रिकेटपटूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप, लंकन क्रीडा मंत्र्यांची माहिती
author img

By

Published : Jun 4, 2020, 9:53 AM IST

कोलंबो - श्रीलंकेचे तीन क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्याचा धक्कादायक माहिती श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी दिली आहे. यामुळे श्रीलंकन क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. लवकरच आयसीसी या प्रकरणाचा तपास करणार आहे.

श्रीलंकेचे क्रीडामंत्री दुलास अलाहापेरुमा यांनी आपल्या देशातील तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये अडकले असल्याचे म्हटले आहे. अलाहापेरूमा यांनी सांगितले की, 'खेळात शिस्त राहिलेली नाही, त्याचबरोबर खेळाच्या पावित्र्यालाही धक्का लागला आहे. मॅच फिक्सिंगसंदर्भात श्रीलंकेच्या तीन क्रिकेटपटूंची चौकशी आयसीसी करणार आहे.'

फिक्सिंग प्रकरणावर श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने सांगितले की, 'मॅच फिक्सिंगचे आरोप ज्या खेळाडूंवर करण्यात आले आहेत, ते सध्याच्या श्रीलंकेच्या संघात नाहीत. आयसीसी लवकरच या प्रकरणाचा तपास करणार आहे. पण सध्याच्या श्रीलंकेच्या राष्ट्रीय संघातील एकही खेळाडू या प्रकरणात नाही.'

काही दिवसांपूर्वीच अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज शेहान मधुशनका याला श्रीलंकन पोलिसांनी अटक केली आहे. मधुशनका राहत असलेल्या पनाला या भागात लंकन पोलिसांनी कारवाई केली, ज्यात त्याच्या गाडीमध्ये दोन ग्रॅम हेरॉईन आढळून आले. पोलिसांच्या या कारवाईनंतर श्रीलंकन बोर्डानेही शेहानवर निलंबनांची कारवाई केलेली आहे.

हेही वाचा - महिला क्रिकेटपटूचा लैंगिक छळ प्रकरणी प्रशिक्षकाची हकालपट्टी

हेही वाचा - गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येमुळे विराट कोहली दु:खी, म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.