ETV Bharat / sports

CRICKET WC : विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यात 'या' गोलंदाजांनी घेतला आहे पहिल्याच चेंडूवर बळी - malachi jones

पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला.

विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यात 'या' गोलंदाजांनी घेतला आहे पहिल्याच चेंडूवर बळी
author img

By

Published : Jun 18, 2019, 4:34 PM IST

नवी दिल्ली - विश्वचषकात पाकिस्तानची भारताकडून होणाऱ्या 'धुलाई'ची परंपरा या स्पर्धेतही कायम राहिली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारताच्या विजय शंकरने आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या इमाम उल-हकला माघारी पाठवले. विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात असे फार कमी गोलंदाज आहेत ज्यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे. खालील गोलंदाजांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर असे बळी घेतले आहेत.

इयान हार्वे (ऑस्ट्रेलिया) -
२००३ सालच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज इयान हार्वे याने पाकिस्तानविरुद्ध खेळताना पदार्पण केले होते. त्याने पहिल्याच चेंडूवर फलंदाज सलीम इलाही याला माघारी पाठवले होते.

मलाची जोन्स (बर्म्युडा) -
२००७ मध्ये बर्म्युडाच्या क्रिकेट संघाने आपली पहिली आणि शेवटची विश्वचषक स्पर्धा खेळली होती. बर्म्युडाचा वेगवान गोलंदाज मलाची जोन्स याने भारताविरुद्ध खेळताना फलंदाज रॉबीन उथप्पाला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.